Regd. No. Mum/00201/2501/NA

Latest News

Organ Donation is a gift for life
Latest News

अहमदनगरमध्ये दुर्मिळ प्रयोगः स्वत-चेच स्वत-ला नेत्रदान

डॉ. प्रकाश कांकरिया
अहमदनगरः डोळयाच्या बुबुळावर टीक पडल्यानंतर येणारे अंधत्वाचे प्रमाण भारतात मोठया प्रमाणात आहे. त्यासाठी कोणीतरी मरणोत्तर नेत्रदान केल्या नंतर हे डोळे काढून नेत्रपेढीकडे जमा करावे लागतात व नंतर कोणा निष्णात डोळयांच्या विशेष सर्जनकडून ही अवघड नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होऊ शकते. दरम्यान ७-८ महिने कोरोनाच्या संकटामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान होऊ शकत नसल्यामुळे नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नव्हत्या.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील ८० वर्षीय रहिवासी लक्ष्मणराव बोहरे यांच्या एका डोळयात अपघाताने जखम झाल्यामुळे व त्यात जंतू संसर्ग झाल्यामुळे डोळयात जखम होऊन टीक पडली व दुसरा डोळा अनेक वर्षापासून मेंदूपासून येणारी नस बंद पडल्यामुळे पूर्णपणे अंधत्व आले होते. लक्ष्मणराव त्यांच्या भागात उपचार होत नसल्याने अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेत आले. मरणोत्तर नेत्रदान बंदच असल्यामुळे बुबुळ उपलब्ध होत नव्हते. त्यांना तो जंतूसंसर्ग झालेला डोळा काढून टाकणे हाच पर्याय होता. परंतु नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांना एक कल्पना सूचली. डोळयाची नस बंद असल्यामुळे डावा डोळा हा अनेक वर्षापासून पूर्णपणे अंध व निकामी झाला होता पण त्याचे बुबुळ चांगले होते.
डॉ. कांकरिया यांनी त्यांच्या डाव्या डोळयाचे बुबुळ काढून उजव्या डोळयावर रोपण केले व त्या डोळयाने त्यांना दिसू लागले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आनंद झाला. अशी घटना दुर्मिळ असल्यामुळे व ती यशस्वी झाल्यामुळे अशीही अंधत्वावर मात करता येते. या घटनेचे अखिल भारतीय नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. महीपाल सचदेव व आयबँक असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री प्रो. डॉ. जीवन टिटियाल यांनी नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या उपक्रमात डॉ. अनिलसिंग तसेच डॉ. चिन्मय ब्रम्हे व साई सूर्य नेत्रसेवाच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले आहे. 'स्वत:चेच स्वत:ला नेत्रदान' अशी जगातील अद्भूत घटना घडली व ती यशस्वी झाली त्यांचे विशेष समाधान लाभल्याची भावना डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया, मानकन्हैय्या नेत्रपेढीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.