Donations of skin, eyes, organs and body are Nobel donations. Facility is available for registration of pledge for all these Nobel donations during the lifetime of the donor. We look to this registration process as the most effective tool to bring about promotion of public awareness regarding these Nobel donations.
The pledge registration process requires near relatives of the Donors to sign pledge form as a witness. This creates awareness of the donor’s entire family. The awareness of not only donor but that of his relatives is more important, because the 'consent' of relatives of the donor is essential at the time of actual donation after death of the donor.
Even after registration of pledge for noble donations, if relatives of the donor does not reatriat consent donation cannot be done. However, on the other hand, if relatives give consent for noble donations, that can be made even when the donor has not registered the pledge for donation.
Further, if and when the donor would make a soft copy of his Donor card viral amongst all his contacts on social media, that will create multifold awareness regarding organ donation.
Therefore, our object is to create maximum registration of pledge for all these noble donations.
त्वचा, नेत्र, अवयव आणि देहदान ही उदात्त दाने आहेत. या सर्व उदात्त दानांसाठी नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध आहे. आम्ही या नोंदणी प्रक्रियेला जनजागृतीचे सर्वात प्रभावी साधन मानतो. नोंदणी अर्जावर दात्यांच्या जवळच्या नातेवाईकांची साक्षीदार म्हणून सही आवश्यक आहे. यामुळे दात्याच्या संपूर्ण कुटुंबात जागरूकता निर्माण होते. दात्याच्या नातेवाईकांची जागरूकता अधिक महत्त्वाची आहे कारण दानांसाठी नातेवाईकांची संमती आवश्यक असते. अर्जांवर साक्षीदार म्हणून सही केली असली तरीही, दात्याच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष दानांच्यावेळी पुन्हा नातेवाईकांनी संमती दिली नाही तर दाने करता येणार नाहीत . मात्र पूर्वनोंदणी केली नसली तरी नातेवाईकांनी संमती दिल्यास, सर्व उदात्त दाने करतां येतात. दात्यांनी आपले डोनरकार्ड सोशल मीडियावर टाकले तर अवयवदाना संदर्भात बहुविध जागरूकता निर्माण होईल.
म्हणूनच सर्व दात्यांची जास्तीत जास्त नोंदणी करणे हा आमचा उद्देश आहे.