Free ‘Organ donation volunteers online training program’
The subject of Nobel donations covering Skin donation, Eye donation, Body donation and Organ donation is covered in this training. This subject is having 8 chapters. Chapter wise Lectures, Knowledge Bank, objective type questionnaire in ‘Google quiz format’ has been prepared by Experts in the field. Entire training material is ‘Bilingual in Marathi & English’.
One has freedom to select a language, either Marathi or English. Please join a telegram group "Online organ donation awareness training community" to get solution to the problems you might come across / तुमच्या समोर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृपया टेलिग्राम ग्रुप "Online organ donation awareness training community"
मध्ये सामील व्हा
Link:
https://t.me/+rB-5iZSVetQ1NDg1
On submission of the answers to questionnaire scores will be informed by email, suggesting right answers for the individual errors that had occurred.
This training will equip one with all that knowledge which is required by a common man regarding Organ donation awareness, avoiding complicated issues which require regular medical education. The knowledge covered in the training is restricted awareness only.
On completion of training e-certificate will be issued.
For the registration for training simply press the Button titled ‘Online training’, and you will receive a link for “Registration Form” on your mobile.
अवयव दान स्वयंसेवक
ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम
विनामूल्य ‘अवयवदान स्वयंसेवक ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम’
अवयवदान जागरूकता स्वयंसेवकांसाठी ‘विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम’ जाहीर करण्यास ‘v4organs foundation’ला आनंद होत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा किंवा किमान शैक्षणिक पात्रता नाही, सर्वांचे स्वागत आहे. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणतीही निश्चित मुदत नाही. एखाद्याच्या सोयीनुसार ती असू शकते. सहभागींना फक्त स्मार्टफोन वापरता येत असला पाहिजे इतकेच.
या प्रशिक्षणात त्वचादान, नेत्रदान, देहदान आणि अवयवदान या उदात्त दानांच्या माहितीचा समावेश आहे. या विषयाचे 8 भाग आहेत व प्रत्येक भागाच्या प्रशिक्षण साहित्याची लिंक क्रमशः पाठवली जाईल. प्रशिक्षण साहित्यात त्या भागावर विस्तृत लेख, व्याख्यानाचा व्हिडीओ, ‘गुगल क्विझ फॉरमॅट’ मधील प्रश्नावली, यांचा समावेश असून ते या क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार केले आहेत. संपूर्ण प्रशिक्षण साहित्य ‘मराठी आणि इंग्रजी भाषेत द्विभाषिक’ आहे. कोणालाही मराठी किंवा इंग्रजी ही भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.
तुमच्या समोर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृपया टेलिग्राम ग्रुप "Online organ donation awareness training community"
मध्ये सामील व्हा
Link:
https://t.me/+rB-5iZSVetQ1NDg1
प्रश्नावलीची उत्तरे सबमिट केल्यावर मिळालेले गूण ईमेलद्वारे कळविले जातील, वैयक्तिक त्रुटींसाठी योग्य उत्तरे सुचवली जातील.
हे प्रशिक्षण सहभागिंना अवयवदान जागृकते विषयी आवश्यक असलेल्या सर्व ज्ञानाने सुसज्ज करेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
प्रशिक्षण नोंदणीसाठी फक्त ‘Online training’असे शीर्षक असलेले बटण दाबा म्हणजे आपल्या मोबाइलवर “नोंदणी फॉर्म” साठी एक लिंक प्राप्त होईल.
Online Training Form Link
>> Click Here