Regd. No. Mum/00201/2501/NA

Latest News

Organ Donation is a gift for life
Latest News

सुपर - 20 किडनी ट्रान्सप्लान्ट

*सुपर - 20 किडनी ट्रान्सप्लान्ट*
लवकरच आपल्या भेटीला....
 
*किडनी ट्रान्सप्लान्ट झाल्यानंतर मनुष्य किती वर्षे जगू शकतो?*
जरा अवघड प्रश्न आहे. याचे स्पेसीफिक असे उत्तर नाही देता येऊ शकत. पण उत्तर शोधायला काय हरकत आहे, म्हणून मी लाॕकडाऊनच्या काळात या प्रश्नाचे  उत्तर शोधण्याच्या कामी लागलो. आधी त्यावर लेख लिहावा असा विचार केला. पण या प्रश्नाचे उत्तर मिळवितांना इतक्या अफलातून गोष्टी कळाल्या आणि किडनी ट्रान्सप्लान्ट झालेल्या अफलातून लोकांशी परिचय झाला की मग ठरवलं की केवळ लेख लिहून याला मर्यादित करण्यापेक्षा याला पुस्तकाचे स्वरूप देऊ या. आणि अशा प्रकारे *सुपर - 20 किडनी ट्रान्सप्लान्ट* हे पुस्तक लिहीण्याच्या विचाराने मला झपाटून टाकले. कोवीड - 19 मध्ये लागलेल्या लाॕकडाऊनच्या काळात मी हे पुस्तक लिहून काढले जे आता लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.
 
*काय आहे सुपर - 20 किडनी ट्रान्सप्लान्ट मध्ये?*
 
*किडनी ट्रान्सप्लान्ट होऊन 20,30 किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या किडनी ट्रान्सप्लान्ट झालेल्या व्यक्तींच्या लाईफ स्टोरीज, लाईफस्टाईल, अनुभव आणि त्यांचा दिर्घायुषी होण्याचा जीवनमंत्र.
 
* पथ्ये पाळणे, व्यवस्थित काळजी घेणे या गोष्टी तर आपण सर्व जण करतोच. पण या व्यतिरिक्त आणखी कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिर्घायुषी होण्यास पूरक ठरतील याची उत्तरे या पुस्तकातून मिळतील.
 
* किडनी ट्रान्सप्लान्ट नंतर आर्थिक नियोजन कसे करावे.
* किडनी ट्रान्सप्लान्ट नंतरचे वैवाहिक जीवन.
* किडनी ट्रान्सप्लान्ट नंतर पर्यटन, प्रवास आणि अॕडव्हेंचर.
* किडनी ट्रान्सप्लान्ट नंतर आनंदी व दिर्घायुषी राहण्याचा जीवनमंत्र.
* किडनी ट्रान्सप्लान्ट नंतर 50 वर्षांपेक्षा जगून केलेला विश्वविक्रम.
* एकाच व्यक्तीचे सातवेळा किडनी ट्रान्सप्लान्ट - एक अनोखा विश्व विक्रम.
* जगातील पहिले रोबोटीक किडनी ट्रान्सप्लान्ट.
* किडनी ट्रान्सप्लान्ट नंतर विवाह करून लिम्का बुक आॕफ रेकाॕर्डमध्ये नाव नोंदवलेल्या जोडप्याची कहाणी.
 
अशी अनेक प्रकारची माहिती या पुस्तकातून वाचकांच्या व विशेष करून किडनी किंवा अन्य अवयव ट्रान्सप्लान्ट झालेल्या व्यक्तींना नक्कीच जगण्याची नवी प्रेरणा, उमेद आणि स्वप्ने देईल या विश्वासासह....
 
आपलाच,
किशोर सुर्यवंशी (लेखक)
मो. 9922100500