1192 दिवसांचा अविरत प्रवास..आणि सार्थक दुसऱ्या आयुष्याचे..किंमत दुसऱ्या श्वासाची..सोबत हजारो हात आज,पुनर्जन्म देण्यासाठी अश्या कित्येक कोमल ला..अवयवदान चळवळी मध्ये एक पान आपल्या कार्याचे...
धन्यवाद ज्या व्यक्तीच्या अवयवा मुळे हे दुसरे आयुष्य इतके सुखकर मिळाले.
धन्यवाद त्या माता पित्याला ज्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला..
धन्यवाद सर्व डॉक्टरांचे ज्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली..
आणि धन्यवाद तुम्हा सर्वांचे ज्यांनी प्रत्यारोपण च्या अगोदर मदत केली,त्यानंतर सुद्धा या कार्यात सोबत राहिलात,एक ताकद बनून,तुमचे आशिर्वाद सदैव पाठीशी होते म्हणूनच हे सर्व घडू शकले...