परमेश्वरा दिलेस शरीर सुंदर
एक एक घडविलास अवयव नंतर
कुणीही बनविणे अशक्य निरंतर
आरोग्यम् धनसंपदा हाच मंतर
जगावे अवयव रूपी मरणा नंतर
अवयव सारे.... डोळे,त्वचा, हृदय,
फुफ्फुसे, किडनी, यकृत, आतडी,
हात आणि पाय करावे दान
दयावे दुसऱ्यास जीवनदान
करावे देहदान,घडवावा डॉक्टर महान
दिले देवाने अवयव उधार
परत करूया दुसऱ्यास साभार
देह, अवयव चितेत जाळू नका
माती मध्ये गाडु नका
नका घालवू वाया फुकट
करा उद्ध़ार सर्वांसकट
अवयवदान हेच श्रेष्ठदान
हेच असूद्या सर्वांना ध्यान
- वैशाली