एक मॉडर्न नऊवारी
श्रीमती सुधा आठल्ये, म्हणजे माझ्या सासूबाई. जन्म कोकणात भिक्षुक घराण्यात, लग्नही तसेच. पण तरी आश्चर्यकारकरित्या स्वत:चे वेगळेपण जपत कर्मकांडाला फाटा देऊन मृत्यूनंतर संपूर्ण देहदानासाठी त्यांनी फॉर्म भरला. अनेकदा बजावून बजावून सर्व मुलासुनांना अणि नातीला देहदानाची सतत आठवण करून देत.
गुरूनानक रुग्णालयात 29 जुलैला पहाटे 3 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जे.जे. चे देहदान विषयक कार्ड होते. परंतू काही तांत्रिक कारणांमुळे, ते देहदान स्विकारण्यास तयार नव्हते. अश्या वेळी आमच्या भावजींनी जपून ठेवलेला श्री. आपटेकाका यांचा नम्बर काढला. त्यांना फोन केल्याबरोब्बर त्यांनी अत्यंत आपुलकीने, सहज पणे सारी चक्रे फिरवली आणि आमच्या सासूबाईंची अंतीम इच्छा पूर्ण झाली.
प्रथम नेत्रदान केले गेले. वयोवृद्ध असल्याने कुणाला दृष्टीदान शक्य नव्हते. परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांचा उपयोग केला जाईल, असे कळले. त्यांची skin चांगली होती. त्यामुळे त्याचेही वेगळे दान केलेय गेले. 6 एक डॉक्टर लोकांची टीम skin घेउन गेली. त्याचा उपयोग भाजल्यामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला जीवन दान मिळेल.
श्री. आपटेकाका यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची माहिती दिल्याने आम्हा अनभिज्ञ लोकांना प्रचंड आधार मिळाला. अगदी affidavit लागेल आणि ते कुठे, कोणाकडे करायचे, तिथ पर्यंत कसे पोहोचायचे, ते घेउन KEMरुग्णालयात कुठल्या गेटने आत शिरून कोणत्या विभागात कोणत्या डॉक्टरना भेटायचे येथ पर्यंत इत्यंभूत माहिती त्यांनी दिली . KEM मध्ये जेव्हा आम्ही पार्थिव घेउन पोहोचलो, तेथिल गार्ड ने गाडी मॉर्ग जवळ लावायला सांगितले. आम्हाला anatomy dept मध्ये डॉ अभिजीत धेन्डे यांना भेटायचे होते. तेथे जातो न जातो तो अतिशय आश्चर्यकारक अनुभव आमच्या वाट्याला आले. एक महिला कर्मचारी, आम्ही काही विचारायचया आधीच 'बॉडी घेउन आलात का', असे प्रेमाने विचारती झाली आणि आमची बसण्याची सोय करून पाणी वगैरे विचारले. डॉ धेन्डेंनी एक छापील अर्ज आमच्या कडून भरून घेत, सर्व पुढील गोष्टी आधीच पूर्ण करून ठेवल्या. जसे देहदानाचे सर्टिफ़िकेट, death certificate साठी लागणारे प्रमाणपत्र ई. आमचे affadavit येताक्षणी पटापट सह्या आणून आमच्या सुपूर्द केल्या. कुठे खोळंबा नाही काही नाही. अर्थात यातही श्री आपटेकाका यांचा मोलाचा वाटा आहेच. त्यांचे फोन सर्व ठिकाणी आम्ही जायच्या आधीच गेल्या कारणाने, सर्व प्रक्रिया अतिशय सुलभ कुठल्याही त्रासाशिवाय पार पडली. आम्ही त्यांचे, त्यांच्या v4organs foundation परिवाराचे आणि या सत्कृत्याच्या मागच्या backstage ला काम करणार्या सर्वांचे शतश: ऋणी राहूच. शिवाय आता आम्ही इतरांना अश्या प्रकारच्या दानासाठी प्रोत्साहन देण्यास charge झालो आहोत.
माधुरी आठल्ये (सून)