माझ्या आईचे नाव रंजना, पण ती मीनाताई - मॅडम नांवानेंच ओळखली जायची.
सर्वांची लाडकी, म्हणजे फक्त घरच्यांचीच नाही तर ऑफिस मधल्यांची,नेहमीची भाजीवाली, देवळातली मंडळी ही सर्व सुध्दा तिच्यावर प्रेम करायची. कारण ती आम्हा मुली, जावई, नातवंडावर जेवढ़े प्रेमाने वागायची तशीच त्यांच्याशी पण वागायची. ती फक्त आमचीच आई नव्हती तर सगळयाऺची आई होती.
तिची सवय होती की चांगले ते सर्व आत्मसात करायची. म्हणून ती जेव्हा तिच्या आत्यांजीच्या कार्याला गेली होती, तेव्हा भटजीचे पूजा करणे, माहिती सांगणे तीला इतके आवडले,की तीने तिथेच निर्णय घेतला, देहदानाचा!
आमच्याकडुन सहया घेतल्या आणि वर्षानीच तिने देह सोडला.
कोणाचीही सेवा न घेता,तीला पाहिजे होते तसे मरण आले *शांतपणे*
मुलगी शिवानी