Regd. No. Mum/00201/2501/NA

In Heaven

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
In Heaven

कै.सुनेत्रा जयदेव मोरे

माझी आई साधी भोळी,प्रेमळ गृहिणी होती. मी परिचारिका असल्याने अवयव दानाची  माहिती  होती. माझ्या  ३५ व्या  वर्षी  मी  नेत्रदानाचा  फॉर्म भरला होता. तसेच  रिटायर झाल्यानंतर मी  देहदान  करणार असं मी ठरवलं होतं. हे  माझ्या  आईला  माहिती  होते.
त्यामुळे तिने  देहदान  करण्याची इच्छा  माझ्या  बहिणी  जवळ  व्यक्त केली होती. मला  आपटेकाकांच्या देहदान अवयवदान जनजागृती चळवळी  विषयीची माहिती सेंटजॉर्ज  हॉस्पिटलमधील  परिचारिका  कडून  मिळाली. त्यानुसार मी आपटेकाकांकडून  माहिती घेतली.
माझ्या आईच्या  देहावसान  नंतर मी आपटेकाकांना फोन करून  कळविले, व  आपटेकाकांच्या  मार्गदर्शना नुसार  सर्व काही केलं.

आई  सकाळी ६ वाजता  घरीच  गेल्या मुळे  डॉ. चे  सर्टिफिकेट मिळाल्यावर फक्त देहदान करता आले.

मृत्यू  नंतर मनांवर जे  दडपण येतं ते देहदान केल्यानंतर  जाणवलं नाही. वाटल  आई  हॉस्पिटलमध्ये आहे,ती  गेलीच नाही.
नातेवाईकांनी  जुन्या रुढी नुसार विरोध  केला, पण आम्ही तिकडे  दुर्लक्ष केले.
आम्हाला  कोणत्याही प्रकारे  त्रास झाला नाही.

आमची  आई आमच्यातून  गेली नसून  ती हॉस्पिटलमध्ये नवीन  डॉक्टर  घडवित  आहे याचा  आम्हाला अभिमान आहे.
आपटेकाकांनी केलेल्या सतत मार्गदर्शना  बद्दल आम्ही  आपले ऋणी आहोत. 
धन्यवाद