Regd. No. Mum/00201/2501/NA

Articles

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
Articles

रिक्त मरण (Die Empty)

वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे "Die Empty" हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली. मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की "जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?" प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये." तर दूसर्‍याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी." त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान *(अवयव, त्वचा-नेत्र-अस्थी इ. टिश्यू  होते, देह होता व ते सर्व उदात्तपणे दान करण्याच्या)* कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात - प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत.
 
याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.
सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे " तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा.
 
रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा.
 
जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा.
जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या.
जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा.
तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांचा सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका.
 
चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा.
 
शर्यत सुरु झाली आहे.
    चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया.
( *कंसातील वाक्य - आपटेकाकांची अल्पशी भर !)*