Regd. No. Mum/00201/2501/NA

अवयवदान कवने

Don't take your organ to heaven ,heaven knows they need it here.
 
अवयवदान कवने

ऐका माझ्या जिवलगांनो

जेव्हा मेंदूमृत्यू गाठेल 
वा दिलाची धकधक थांबेल
माझी वाट अशी असेल
यम देव सहज फसेल.
नयना नवे कोंदण असेल
दोन जिवांना जग दिसेल
जखमांना कवच असेल
माझी त्वचा तिथे वसेल
रुग्णांना अवयव मिळेल वा
तरुणांचा डॉक्टर घडेल
माझी काया साक्षी असेल
यमाला मग काम नसेल

जाळा या जन्मीच्या चुका
माझी काया जाळू नका
इच्छा माझी टाळू नका
माझ्या जिवलगांनो हे ऐका।
-आपटेकाका